मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील ‘दगडी चाळ’ या चित्रपटाने बाॅक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला होता. ‘दगडी चाळ’ म्हणलं की आठवतो तो म्हणजे झुबकेदार मिशी, पांढरा शर्ट, काटक शरीरयष्टी असणारा इतिहासातील नाव अरूण गवळी. नुकताच सोशल मिडियाद्वारे दगडी चाळ-2 या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
बाकीचे सगळे डॅान देशाबाहेर पळून गेले. पण अरूण गवळी हा एकमेव असा डॅान ज्याने येथेच राहून चाळीच्या लोकांवर होणारा अन्यायविरूद्ध लढा दिला. पोलिसांच्या आधी लोकांना न्याय मिळवून देणारा लोकांचा राँबीन हुड अशी ओळख निर्माण केली.
दरम्यान, अंखड पडणारा पाऊस त्यातून येणारा डॅान अरुण गवळी यांची दमदार एन्ट्रीने प्रेक्षकाचीं उत्कंठता वाढवली आहे. नुकताच सोशल मिडियाद्वारे या चित्रपटाच्या टिझर प्रदर्शित केला आहे. याचवेळी दगडी चाळ-2 हा चित्रपट 18 ऑगस्टला प्रेक्षकाच्या भेटीला येणार असल्याचंही सांगितलं आहे.
प्रेक्षकांनी दगडी चाळ या चित्रपटाला दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आम्ही या चित्रपटाच्या दुसऱ्या भाग आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहोत. या चित्रपटाची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड रिलीज करण्याचा मानस आहे, असं व्यक्तव्य चित्रपट निर्मात्या संगीता अहिर यांनी केलंय.
थोडक्यात बातम्या
अग्निपथ योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणारे सरकारच्या निशाण्यावर केली धडक कारवाई
भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
‘आमदारांना सातत्याने फोन येत आहेत’; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
अग्निवीरांसाठी आनंद महिंद्रांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
आजारी असतानाही मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी मुंबईकडे रवाना!
Comments are closed.