बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई | पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पुर्णपणे आपली ताकत लावताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्तीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यापाठोपाठ रामानंद सागर निर्मित प्रसिद्ध टीव्ही सिरियल ‘रामायण’मध्ये श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

1990 च्या दशकातील प्रसिद्ध पौराणिक मालिका रामायण यामधील अभिनेता अरूण गोविल हे प्रसिद्ध होते. त्यांची रामायणातील रामाची भूमिका ही प्रचंड गाजली होती. त्यामुळे देशातील कोट्यवधी हिंदूंसोबत गोविल यांच्याशी भावनिक नातं आहे. भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

अरूण गोविल यांनी दिल्लीच्या भाजप कार्यालयात पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणती जबाबदारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, अरूण गोविल यांच्यापूर्वी रामायणातील इतर कलाकारही राजकारणात आले होते. रामायणात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर त्यांच्यासह हनुमानाची भूमिका करणारे दारा सिंह आणि रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदीसुद्धा राजकारणात उतरले होते. सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी भाजपच्या तिकिटावर दोनदा निवडणूकही लढवली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा”

महाराष्ट्रातील आवडता नेता कोण?, सोनू सूद म्हणाला…

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात फेरबदल?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं मंत्रिपद धोक्यात

‘राज्यात भाजपचं सरकार आल्यावर….’; नरेंद्र मोदींनी बंगालच्या जनतेला दिला शब्द

भारीच की! बीएम डब्लूची इलेक्ट्राॅनिक कार लवकरच लाँच, एकदाच करा चार्ज अन्….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More