बिटकॉईन खरेदी करणारांना मोठा झटका, जेटलींची घोषणा

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून व्हर्चुअल चलन बिटकॉईनचा चांगलाच डंका सुरु आहे. मात्र अर्थसंकल्प सादर करताना या आणि अशा चलनधारकांना सरकारने धक्का दिलाय. 

क्रिप्टो करन्सी कायदेशीर नाहीये. या करन्सीचा उपयोग काळा पैसा साठवण्यासाठी होतो. त्यामुळे अशाप्रकारच्या करन्सीचा वापर थांबवण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील, असं अरुण जेटली यांनी स्पष्ट केलंय.

बिटकॉईनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील अनेकांना या चलनाच्या वाढत्या किंमतीने भुरळ घातलीय. ही बातमी लिहित असताना एका बिटकॉईनची किंमत 6 लाख 28 हजार 843 रुपये होती.