पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेल्या अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकराची एकूण तीन पथकं चौकशी करत आहेत. याअगोदर पोलीस पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, काल पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यानंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आणखी किती वर्षे टोल वसुली करणार?’; उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं
राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; पाहा काय आहे प्रकरण
आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल, राजेश टोपे म्हणाले…
लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही- चित्रा वाघ