बीड | पूजा चव्हाणा आत्महत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पूजाच्या आत्महत्येशी थेट राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. रोज डेच्या दिवशी पूजाने पुण्यात पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणाशी निगडीत काही ऑडिओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये अरूण राठोड नावाचा तरूण कथित मंत्र्याशी बोलत असल्याचं बोललं जात आहे. अशातच संशयित तरूण अरूण राठोड या तरूणाच्या आईने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माझा अरुण बेकसूर हाय, त्याच्यावरील संमदे आरोप खोटे हाय, असं अरूणची आई मीराबाई राठोड यांनी म्हटलं आहे. महत्वाचं म्हणजे मीराबाई राठोड म्हणाल्या की, पूजा चव्हाण आणि अरूण राठोड हे एकमेकांना ओळखत नाहीत. तो पूजाबद्दल आमच्याशी कधीच बोलला नाही, अरूणला या प्रकरणात गोवलं जात आहे.
अरुणचं कुटुंब गावात आलं असलं तरी अरुण मात्र अद्याप आलेला नाही. अरुण दोन दिवसात माध्यमांसमोर येईल, असं अरूणच्या नातेवाईकांनी सांगितलं. अरूणच्या आई माध्यमांशी बोलत होत्या तेव्हा त्यांची मनस्थिती ठीक नव्हती. अरूण हा संजय राठोड यांचा जवळच कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाता आता अरूण जेव्हा समोर येईल तेव्हा काही गोष्टी उघड होतील. त्यानंतर पोलिसांनाही प्रकरणाबाबात चौकशी करण्यासाठी मदत होईल. मात्र अरूण केव्हा माध्यमांसमोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं स्वागत
“कारखान्याला फुकट पैसा आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं”
“उद्योगपती मित्रांसाठी मोदींनी देशाची संपत्ती विकायला काढली”
शरद पवारांच्या आदेशानंतर ‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टी!
“तेंडुलकर आणि लतादीदींच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही, लता मंगेशकर आमचं दैवत”
Comments are closed.