भाजपला हरवण्यासाठी भाजपच्याच माजी मंत्र्याचा फॉर्म्युला!

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांनी एक फॉर्म्युला सांगितला आहे. वाजपेयी सरकारमधील मंत्री अरुण शौरी यांनी यासाठी विरोधकांना आवाहन केलंय. 

2019 मध्ये भाजपला हरवायचं असेल तर विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. भाजपच्या प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात सर्व विरोधकांनी मिळून एकच उमेदवार द्यावा, असं अरुण शौरी यांनी म्हटलंय. 

सोशल मीडिया पंडित अंकित लाल यांनी लिहिलेल्या इंडिया सोशल या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित होते.