साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे

यवतमाळ  | लेखिका नयनतारा सेहगल यांच निमंत्रण चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आले. आयोजकांकडून ही गंभीर चुक झाल्याचं स्पष्ट मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं आहे.

मराठी साहित्य संमेलन बाह्य शक्तींच्या ताब्यात जात आहे. ज्यांचा साहित्याशी काडीचाडी संबंध नाही अशांपुढे आयोजकांनी नमते घेतले, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सेहगल याठिकाणी येऊन आपले विचार मांडणार होत्या. त्यांचे विचार स्वीकारायचे किंवा नाही हे आपण ठरवायचे असते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या शक्तीवर विश्वास ठेवून झुंडशाहीसमोर न झुकता असले प्रकार घडू नये याची खबरदारी साहित्यिक आणि वाचकांनी घ्यावी, असं अरुणा ढेरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-सपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार

-पंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग

-“बोफोर्समुळे काँग्रेसची सत्ता गेली, राफेल घोटाळ्यामुळे भाजपची जाणार”

-“पानिपतचं युद्ध विजयासाठी नाही तर पराभवासाठी ओळखलं जातं हे विसरु नका”

-मायावती-आखिलेशांची ‘काँग्रेस’ बरोबर युती नाही मात्र अमेठी-रायबरेलीत काँग्रेसला साथ