Top News

… म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिल्या रोहित पवारांना शुभेच्छा

नवी दिल्ली | दिल्लीतील शाळा पाहून प्रभावित झालो होतो. आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्यासाठी आम्ही दिल्ली सरकारचं स्कूल मॉडेल आत्मसात करत आहोत. मी लवकरच दिल्लीतील शाळांप्रमाणे स्कूल मॉडेल राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं. रोहित यांच्या या ट्विटला अरविंद केजरीवाल यांनी रिट्विट करत रोहित यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

फक्त शिक्षणातच आपल्या देशातील विकासाचे अन् बदलाचे सर्वात सामर्थ्य असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं. यावर रोहित पवार यांनी केजरीवाल यांच्या ट्विटला रिट्विट करत मी माझ्यापरीने प्रयत्न करेन, असं म्हटलं आहे.

Loading...

देशातील प्रत्येक राजकीय पक्ष आणि राज्यांनी एकमेकांपासून काहीतरी शिकायला हवं, प्रेरणा घ्यायला हवी, तेव्हा भारत देश नक्कीच विकसित होईल. शिक्षण हेच बदलाचे सामर्थ्यशाली माध्यम असल्याचंही, केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रोहित यांनी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील शाळांना भेट देऊन येथील स्कूल मॉडेलचा कौतुक केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा दिल्लीतील शाळा भेटीचे फोटो रोहित यांनी शेअर केले आहेत.

 

Loading...

ठळक बातम्या-

छ. शिवरायांवरील पुस्तक मागे घेणार नाही, त्याचं…; उदयनराजेंच्या इशाऱ्यानंतर गोयल यांची प्रतिक्रिया

Loading...

शरद पवार हे ‘जाणता राजा’च आहेत; आव्हाडांच्या वक्तव्याचं सुशीलकुमार शिंदेंकडूनही समर्थन

“मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Loading...

ताज्या बातम्या