Top News देश

अरविंद केजरीवालांच्या लेकीचा भाजपला टोला; म्हणाली…

नवी दिल्ली | अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने यंदाच्याही विधानसभा निवडणूकीत विरोधी पक्षांचा धुव्वा उडवला. यावर अरविंद केजरीवालांच्या लेकीने विजयानंतर प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे.

विरोधकांना जनतेने मतपेटीतून उत्तर दिलं आहे. विरोधकांनी शिव्या-शाप देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे त्यांना मतं मिळाली नाही. काम केल्यावर मतं मिळतात. त्यासाठी रुग्णालय, शाळा आणि मोहल्ला क्लिनीक सुरू करावं लागतं, असं म्हणत हर्षिताने भाजपला टोला लगावला आहे.

मी स्वत: बुथ लेव्हलवर काम केलं आहे. प्रचाराच्या काळात लोकांचा उत्साह पाहिला. त्यामुळे आपचा दणदणीत विजय होईल, असा विश्वासही मला असल्याचं हर्षिताने म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला 62 तर भाजपला 8 आणि काँग्रसेला भोपळाही फोडता आला नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

“अरे बंगल्यांवर उधळपट्टी कशाला करताय, बंगले पूर्ण होण्याआधीच तुम्ही जाणार आहात”

…म्हणून रितेश-जेनेलिया घेणार महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची पत्नीसह भेट!

महत्वाच्या बातम्या-

शासकीय कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारचं मोठं गिफ्ट; 29 फेब्रुवारीपासून 5 दिवसांचा आठवडा

निकाल लागताच दिल्लीकरांना केंद्र सरकारचा दणका; गॅस सिलेंडर 144 रुपयांनी महागला

“देशभक्ती म्हणजे उत्तम शिक्षण, हॉस्पिटल सुविधा, वीज आणि पाणी पुरवणं होय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या