बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदी माझे पंतप्रधान; केजरीवालांनी पाकिस्तानच्या मंत्र्याला सुनावलं

नवी दिल्ली | पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करावा असं आवाहन दिल्लीकरांना केलं होत. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तानच्या मंत्र्याला चांगलच सुनावलं आहे.

नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत. तसेच ते माझे देखील पंतप्रधान आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक ही आमची अंतर्गत बाब आहे. त्यात अतिरेकी कारवाया करणाऱ्या देशाने नाक खुपसू नये. भारताच्या अंतर्गत घडामोडींमध्ये नाक खुपसू नका, असा इशारा केजरीवाल यांनी चौधरी यांना दिला. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

पाकिस्तानने कितीही प्रयत्न केले तरी आमच्या एकतेला धक्का पोहचू शकत नाही. तुम्ही पुन्हा असा हस्तक्षेप करू नका आणि तो सहनही केला जाणार नाही, असं केजरीवाल यांनी ट्विमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपच्या नेत्यांकडून केजरीवालांना अतिरेकी संबोधण्यात आलं होतं. मात्र पाकिस्तानच्या मंत्र्यानी केलेल्या टीकेवर केजरीवालांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला.

 

ट्रेंडिंग बातम्या-

निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांच्या फाशीला स्थगिती

जास्त हाॅर्न वाजवा, जास्त वाट पाहा; मुंबई पोलिसांची भन्नाट युक्ती.. पाहा व्हिडीओ

महत्वाच्या बातम्या-

भाजपनं सुरु केलेल्या योजना बंद करु नका; रावसाहेब दानवेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये रंगला बॅडमिंटन सामना; विखेंचीही उपस्थिती

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला ठाकरे सरकारकडून ब्रेक?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More