नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र या बजेटमधून दिल्लीला विशेष असं काही मिळालं नाही. केंद्र सरकारकडून पुन्हा दिल्लीला डावलण्यात आलं असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
आजच्या अर्थसंकल्पाकडून दिल्लीच्या जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र केंद्र सरकारने त्यांचा अपेक्षाभंग केला आहे. पुन्हा एकदा दिल्लीवाल्यांला सावत्रपणाची वागणूक दिली असल्याची बोचरी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपने दिल्लीच्या जनतेच्या पदरी निराशा दिली आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर ते दिलेले वचन पूर्ण करतील यावर कसा विश्वास ठेवावा?, आणि भाजपला मतदान का करावं, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातूनही मोदी सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे.
दिल्ली को बजट से बहुत उम्मीदें थी। लेकिन एक बार फिर दिल्ली वालों के साथ सौतेला व्यवहार हुआ। दिल्ली भाजपा के प्राथमिकताओ में आता ही नहीं, तो दिल्ली वाले भाजपा को वोट क्यों दे? सवाल ये भी है की चुनाव से पहले ही जब भाजपा दिल्ली को निराश कर रही है तो चुनाव के बाद अपने वादे निभाएगी?
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 1, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
आता मोबाईलसारखं वीजेसाठीही आधीच रिचार्ज करावं लागणार!
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी नव्या योजनांची नांदी
महत्वाच्या बातम्या-
सरकारचा नवा टॅक्स स्लॅब; तुमच्या इतक्या वार्षिक उत्पन्नावर लागणार इतका टॅक्स!
आता चिंता नाही! बॅंक डुबली तर मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे
मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘नवी बाटली जुनी दारू’; काँग्रेसची टीका
Comments are closed.