नवी दिल्ली | सध्या संपूर्ण देशभरात कृषी कायद्याचा मुद्दा गाजतोय. याचे पडसाद दिल्लीच्या विधानसभेत देखील पडल्याचे दिसून आले. दिल्लीच्या विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्याची प्रत फाडून टाकली आहे.
कृषी कायद्यांसंदर्भात दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. यावेळी विधानसभेत, आणखी किती बळी घेणार असा प्रश्न विचारत संतापाने कृषी कायद्याची प्रत फाडली.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “देशातला शेतकरी हा भगत सिंहप्रमाणे आहे. आणि त्याचप्रमाणे ते कायद्यांविरोधात आंदोलन करतायत. मला केंद्र सरकारला विचारायचं आहे की शेतकऱ्यांचा आवाज ऐकण्यासाठी त्यांना अजून किती बलिदान द्यावं लागणार आहे.”
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना बिलांचा फायदा सांगताना, त्यांच्या ताब्यात असलेली त्यांची जमीन घेतली जाणार नाही असं सांगितलं. हा त्यांचा फायदा आहे का?” असा सवालही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलाय.
थोडक्यात बातम्या-
बापरे! हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरने दिल्ली चक्क लाखो रूपयांची टीप
मेसेज आलेल्या व्यक्तीला दिली जाणार कोरोनाची लस; आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
…तर जानेवारीपासून राज्यात लसीकरणाला सुरुवात होईल- राजेश टोपे
कर्णधार विराट कोहलीच्या नावे नवा विक्रम; धोनीलाही टाकलं मागे
संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी; प्रविण दरेकर यांची मागणी