देश

…म्हणून अरविंद केजरीवाल यांनी केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक!

नवी दिल्ली | शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. याच निर्णयाचं आम आदमी पक्षाने कौतुक केलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्रातही लागू केल्याबद्दल राजकीय सिमा बाजूला ठेवून देवेंद्र फडणवीसांचे आभार, असं ट्विट आपकडून करण्यात आलं आहे.

याआधी शहिद जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रूपये मदत म्हणून दिली जात होती. मात्र आता एक कोटींची मदत देण्यात देणार आहे. तर जखमी जवानांना 20 ते 60 लाखांपर्यंतची मदत दिली जाणार आहे.

या मदतीने कुटुंबाचे नुकसान भरून निघणार नाही मात्र सरकारने केलेल्या मदतीमुळे त्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी नक्कीच मदत होईल, असंही आपच्या या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या