देश

राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या जागांसंदर्भात अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | निकालाआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य केला आहे. दिल्लीतील सर्वच्या सर्व जागा जिंकू असे वाटले होते, पण ऐनवेळी मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला साथ दिल्याची खंत केजरीवाल यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.

दिल्लीतील सातही जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार विजयी झाले असते, पण शेवटच्या क्षणी मुस्लिम समाजाची मते काँग्रेसकडे वळली. दिल्लीत 12 ते 13 टक्के मुस्लिम मते आहेत, असं केजरीवाल म्हणाले.

निवडणुकीच्या एक दिवस आधी असे काय घडले की ‘आप’ला मिळणारी मते दुसऱ्या पक्षाकडे गेली, हे जाणुन घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असंही केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, या परिस्थितीत ‘आप’च्या किती जागा निवडून येतील याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही.

महत्वाच्या बातम्या

मोदी-ममता संघर्ष अजूनही सुरूच; मोदींच्या दौऱ्यातून आचारसंहिता भंगाचा तृणमूलचा आरोप

-चंद्राबाबू नायडू आणि तुमच्यात काय बोलणं झालं?? पवार म्हणतात…

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आमदार मुनीरत्न यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट

-पश्चिम बंगालमध्ये राडा; भाजप कार्यकर्त्यावर धारदार शस्त्राने हल्ला

-पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कार्यकर्त्यांची गुंडगिरी; मतदानापासून नागरिकांना रोखलं!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या