Top News देश

…म्हणून नरेंद्र मोदी माझ्या शपथविधीला गैरहजर राहिले- अरविंद केजरीवाल

Loading...

नवी दिल्ली |  दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. 12. 15 वाजता त्यांना दिल्लीच्या नायब राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधीचं आमंत्रण असूनही ते शपथविधीसाठी गैरहजर राहिले.

पंतप्रधान मोदी आजच्या नियोजित वाराणसी दौऱ्यावर असल्याकारणाने ते शपथविधीला जाऊ शकले नाहीत, असं कळत आहे. मात्र, त्यांच्या गैरहजेरीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केलेल्या भाषणात मोदींचा उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी आपल्या कामात व्यस्त आहेत, त्यामुळे ते निमंत्रण देऊनही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, असा टोला केजरीवाल यांनी लगावला. केजरीवालांचा शपथविधी सोहळा पार पडत असताना मोदी वाराणसीमध्ये होते.

दरम्यान, मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीकरांना संबोधून अतिशय भावूक असं भाषण केलं. मी कोणत्याही एका पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून काम करणार नाही, सर्व पक्षाचे लोक माझ्याकडे येऊ शकतात, असं ते म्हणाले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान!

कारवाई केली तर इंदुरीकरांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू- सुरेश धस

महत्वाच्या बातम्या- 

धक्कादायक! जामियाच्या विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा व्हिडीओ व्हायरल!

भाजपची ‘ती’ भविष्यवाणी आणखी चार वर्ष तरी खरी होणार नाही- शरद पवार

शेती करताना तरी इंंदुरीकरांनी कामासाठी येणाऱ्या महिलांशी नीट बोलावं- तृप्ती देसाई

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या