“बडे नेते जेलमध्ये जाणार”; अरविंद केजरीवालांच्या दाव्यामुळे खळबळ

Arvind Kejriwal said if Modi comes to power Uddhav Thackeray will be jailed

Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे सध्या केजरीवाल जामिनावर बाहेर आले आहेत. आज (11 मे) त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक दावे केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत केजरीवाल यांनी गंभीर आरोप केले आहेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायचंय. ते विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवतील. माझ्याकडून तुम्ही एफिडेविट लिहून घ्या, हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, तेजस्वी यादव आणि स्टॅलिन तुरुंगात दिसतील”, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

“मोदी सत्तेत आले तर..”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “भाजपाच्या एका नेत्याला यांनी सोडलं नाही. शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मनोहर लाल खट्टर यांचं राजकारण यांनी संपवलं. हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर पुढच्या दोन महिन्यात उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्रीही बदलतील,” असं अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी म्हटलं आहे.

यावेळी केजरीवाल यांनी लोकसभेच्या निकालाबाबतही भाकीत केलं आहे. “जेलमधून बाहेर आल्यावर गेल्या 20 तासात मी देशभरातल्या अनेकांशी बोललोय, त्यावरून असा अंदाज येतो की 4 जून नंतर भाजपचं सरकार बनणार नाही.जवळपास सर्वच राज्यात भाजपच्या जागा कमी होणार आहेत. सट्टा बाजारानुसार 220 जागा येऊ शकतात.” असा दावा देखील अरविंद केजरीवाल यांनी केलाय.

“अमित शहा पंतप्रधान होणार”

केजरीवाल यांनी एकंदरीत भाजपवर हे सर्व आरोप केले आहेत. त्यांनी कोर्टाचे देखील आभार मानले. तसंच पंतप्रधान कोण होणार, याबाबतही त्यांनी एक भविष्यवाणी केली आहे. पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला मोदी निवृत्त होत आहेत, मग भाजपला मी विचारतो प्रधानमंत्री पदाचा दावेदार कोण आहे? जर यांचं सरकार आलं, तर योगी यांना डावलून अमित शहा यांना पंतप्रधान केलं जाईल, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल 1 जून पर्यंत अंतरिम जामिनावर बाहेर आले आहेत. 2 जूनला पुन्ह त्यांना तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण करावं लागणार आहे. केजरीवाल (Arvind Kejriwal )निवडणूक प्रचार, पत्रकार परिषदा घेऊ शकतात असं कोर्टाने म्हटलं आहे.  तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला.

News Title – Arvind Kejriwal said if Modi comes to power Uddhav Thackeray will be jailed

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात राज ठाकरेंच्या सभेचा इम्पॅक्ट होणार, फतव्यामुळं मोहोळांचं पारडं जड

अजित पवारांच्या सभांनंतर नूर पालटला, राष्ट्रवादीची सगळी ताकद श्रीरंग बारणेंच्या पाठिशी!

“राज ठाकरेंना आताच एवढा पुळका का?, भाजपची राज ठाकरेंनाही धमकी?”

पुढील चार दिवस धोक्याचे; पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

प्रज्वल रेवन्नानंतर भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, राजकारणात खळबळ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .