बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत होता तेव्हा मी रात्री जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो”

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या ऑक्सिजन ऑडिट कमिटीने मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकदरम्यान दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा आणि वापर यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा केलाय.

दिल्लीवासीयांसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गरजेपेक्षा चारपट ऑक्सिजन मागून घेतला. दिल्लीला पुरवठा करण्यात आलेला ऑक्सिजन आणि प्रत्यक्ष वापर यांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीने तयार केलेल्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याला उत्तर देत केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

मी दोन कोटी लोकांच्या जीवासाठी लढलो, हा माझा गुन्हा आहे. जेव्हा तुम्ही निवडणुकीसाठीच्या प्रचारसभा करत होता त्यावेळी मी रात्री जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो. नागरिकांना ऑक्सिजन मिळण्यासाठी भांडलो, हात पसरले, विनंत्याही केल्या. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तींना गमावावं लागलं आहे. त्यांना खोटारडे म्हणू नका, त्यांना फार वाईट वाटत आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.

दरम्यान, हा रिपोर्ट भाजपच्या मुख्यालयातून तयार करण्यात आल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. तसेच आम आदमी पक्षाने हा अहवाल दिशाभूल करणारा आणि चुकीचा असल्याचा आरोप केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी सीबीआयशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता”

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

‘हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील पण…’; खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा; आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More