Top News

प्रत्येकाला मोफत लस मिळावी, सर्व देशवासियांचा तो अधिकार आहे- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | देशातील सर्व जनतेला कोरोना लस मोफत मिळाली पाहिजे. सर्व देशवासियांचा तो अधिकार आहे, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.

प्रत्येक नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहे, यामुळे मोफत कोरोना लस मिळणे गरजं आहे, असं केजरीवाल म्हणालेत. अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते आज शास्त्रीनगर-सीलमपूर उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अरविंद केजरीवाल बोलत होते. त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

कांद्याच्या वाढत्या किमंतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला काम करण्याची गरज आहे. आम्ही आवश्यक ते प्रयत्न करु, असं केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रसरकारने हस्तक्षेप करणं गरजेचे आहे. तरच देशातील कांदा दर नियंत्रित होतील असं केजरीवालंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा, प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करावं”

दुपारी झोपण्यावरून चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांना टोला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला, ‘या’ सरकारी रुग्णालयात घेत आहेत कोरोनावरील उपचार

मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार- एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या