बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीवालो…आय लव्ह यू- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. केजरीवालांनी पुन्हा एकदा भाजपला धोबीपछाड देत दिल्लीकरांची मनं जिंकली आहे. निकाल स्पष्ट होताच केजरीवालांनी दिल्लीकरांशी संवाद साधला आणि त्यांचे आभार मानले आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी निवडणुकीत दिलेल्या यशाबद्दल मतदारांचे आभार मानले. दिल्लीकरांनो तुम्ही लोकांनी कमाल केलीत. आय लव्ह यू, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.

दिल्लीकरांनी त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला, त्याबद्दल आभार. हा केवळ दिल्लीचा नाही तर संपूर्ण देशाचा विजय आहे. दिल्लीच्या जनतेनं आज एका नव्या राजकारणाला जन्म दिलाय, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

ज्यांनी मला आपला मुलगा मानत प्रेम दिलं, ज्यांच्या घरात चांगलं शिक्षण मिळालं, गरजा पूर्ण झाल्या त्या प्रत्येकाचा हा विजय आहे, अशा शब्दांत केजरीवालांनी या विजयाचं वर्णन केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

“भाजप देशाची आपत्ती आहे, ती घालवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे”

दिल्लीच्या निकालावर कमलनाथ यांची आश्चर्यकारक प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या- 

ग्लॅमरस अंदाजातल्या सई, ललित, पर्णचा ‘मीडियम स्पाइसी’ झळकणार 5 जूनला !

दिल्लीच्या जनतेनं आज एका नव्या राजकारणाला जन्म दिला- अरविंद केजरीवाल

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More