नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. केजरीवालांनी पुन्हा एकदा भाजपला धोबीपछाड देत दिल्लीकरांची मनं जिंकली आहे. निकाल स्पष्ट होताच केजरीवालांनी दिल्लीकरांशी संवाद साधला आणि त्यांचे आभार मानले आहेत.
दिल्लीकरांनी त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला, त्याबद्दल आभार. हा केवळ दिल्लीचा नाही तर संपूर्ण देशाचा विजय आहे. दिल्लीच्या जनतेनं आज एका नव्या राजकारणाला जन्म दिलाय, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
ज्यांनी मला आपला मुलगा मानत प्रेम दिलं, ज्यांच्या घरात चांगलं शिक्षण मिळालं, गरजा पूर्ण झाल्या त्या प्रत्येकाचा हा विजय आहे, अशा शब्दांत केजरीवालांनी या विजयाचं वर्णन केलं आहे.
दरम्यान, दिल्लीच्या निकालाने देशाला नवी दिशा दिली आहे, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
आता भाजपच्या पराभवाची मालिका थांबणार नाही- शरद पवार
“दिल्ली विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने मॅच फिक्सिंग केली”
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही- शरद पवार
दिल्लीकरांनी भाजपच्या भ्रमाचा भोपळा फोडला- उद्धव ठाकरे
“भाजप देशाची आपत्ती आहे, ती घालवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे”
Comments are closed.