नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून 11 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या विविध एक्झिट पोलनुसार निवडणुकीत आपचा विजय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, भाजप नेते सुनिल यादव यांनी वेगळं भाकीत व्यक्त केलं आहे.
केजरीवाल यांचा पराभव होणार आहे आणि भाजपचा विजय निश्चित आहे. जर असं झालं नाही तर मी पुन्हा कधीच निवडणूक लढवणार नाही. आयुष्यभर फक्त संघटनेचं काम करत राहिन, भारत माता की जय, असं यादव म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपनं सुनिल यादव यांना उमेदवारी दिली होती. याबद्दल यादव यांनी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि पक्षाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, एक्झिट पोलचा अंदाच खोटा ठरवत भाजप दिल्लीत बाजी मारतं का? हे पाहावं लागेल.
ट्रेंडिंग बातम्या-
…म्हणून मनसेच्या मोर्चाला माझ्या गाड्या- महेश लांडगे
हिंदूहृदयसम्राटानंतर उत्साही मनसैनिकांनी राज ठाकरेंना दिली ही उपाधी!
महत्वाच्या बातम्या-
ओबीसींचा रकाना सामाविष्ट न केल्यास जनगणनेवर बहिष्कार- नाना पटोले
मनसेच्या मोर्चासाठी दिव्यांग आजोबा नगरहून मुंबईत दाखल!
“काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत सत्ता चालवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये”
Comments are closed.