Top News देश

“दादा बंगालचा वाघ, भाजपमध्ये आल्यास त्याचं नक्कीच स्वागत करु”

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशातच बंगाल भाजपचे सह प्रभारी अरविंद मेनन यांनी यावर खुलासा केला आहे.

दादा बंगालचा वाघ आहे त्याला राजकारणात प्रवेश करण्याबाबत कोणताही राजकीय दबाव नाही. पण जर गांगुली भाजपमध्ये आला तर त्याचे नक्की स्वागत करू, असं अरविंद मेनन यांनी म्हटलं आहे.

सौरव गांगुलीला 2 जानेवारीला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यावेळी गांगुलीला हा झटका राजकीय दबावामुळेच आला असल्याचा दावा सीपीएमचे आमदार अशोक भट्टाचार्य यांनी केला होता.

दरम्यान, गांगुलीने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र गेल्या काही दिवसांमागे गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय; मुख्यमंत्र्यांचं केंद्राला पत्र

‘होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात’; नाव घेता पडळकरांची शरद पवारांवर टीका

जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न- भाजप

संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल तर तर दुसरं नाव सांगा- चंद्रकांत पाटील

…तर मग यावर्षीचा प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये?- शशी थरूर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या