Top News महाराष्ट्र मुंबई

“दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले, सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले”

मुंबई | भाजप नेते नारायण राणे आयत्या बिळावर नागोबा आहेत जिथे सत्ता तिथे ते. हिंदुत्वाचा विचार आणि तत्व अमित शहांनी ज्यांच्या व्यासपीठावरून मांडली त्यांनी सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राणे आणि शहांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

नारायण राणेंच्या बाजुला बसलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवं होतं की राणेंबाबत सभागृहात काय म्हटलं होतं?, नारायण राणेंनी भाजपला गुंडांचा पक्ष म्हटलं होतं. त्यावर फडणवीसांनी राणे कसे गुंड आहेत हे सांगितंल होतं. त्यामुळे दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले हे दिसलं असल्याचं म्हणत सावंत यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला.

केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंना घेतलं तरी काय फरक पडणार नाही, कालचा गुंड आज मंत्री कसा झाला? याचं उत्तर त्यांनाच द्यावं लागेल, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धमक्या देऊन माणसांना पक्षात घ्यायचं हेच भाजपचं काम असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी भाजपवर केला.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! सासऱ्याने आपल्या गर्भवती सुनेवरच केला बलात्कार त्यानंतर दिली ही धमक

‘एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती तर….’; शिवसेनेचा पलटवार

“…त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून जिवंतपणीच श्राद्धे घातलीत”

‘वा रे वा… महाराष्ट्राचे कारभारी लयभारी’; शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

‘ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं’; आव्हाडांचा अमित शहांना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या