“मनसे बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंडाही नाही”
मुंबई | राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पाडव्याच्या निमित्तानं घेतलेल्या सभेनंतर तर कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे. सगळेजण एकमेकांवर हल्लाबोल करत असल्याचं दिसत आहे.
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arwind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे (mns) ही बिनबुडाची झाली आहे. तिला बुडही नाही आणि शेंडाही नाहीये. मनसेचा झेंडा बदलला तसा त्यांचा विचारही बदलला आहे. लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे आता भाजपचे कॉन्ट्रॅक्टर झाले आहेत, असा खोचक टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वादळी सभेनं राज्यातील वातावरण जोरदार पेटलं आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना राज यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान, राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर सध्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत असून त्यांच्यावर टीकास्त्रांचाही वर्षावर होत आहे.
थोडक्यात बातम्या –
“न्यायालयाने भोंगे खाली उतरावायचे आदेश दिले आहेत त्याचं पालन करा आणि मग…”
अभिनेत्री सोनम कपूरचे बेबी बंप फ्लाॅन्ट करताना फोटो व्हायरल, पाहा फोटो
कडाक्याच्या उन्हात अवकाळी पावसाचं सावट, पुढील 4,5 दिवस महत्त्वाचे
“राज ठाकरेंचा सगळा सिझनेबल कार्यक्रम, ते ऋतूप्रमाणे बदलणारे नेते”
“लग्न एकासोबत केलं आणि संसार दुसऱ्यासोबत, हे चांगलं नाही”
Comments are closed.