मुंबई | महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झालं. भविष्यात त्यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला.
प्रकाश जावडेकर यांच्या टीकेला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा कशी कमी होतील, हा भाजपचा प्रयत्न होता. त्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री तेव्हा सिंधुदुर्गात ठाण मांडून बसले होते. ती भाजपची गद्दारी होती की इमानदारी, असा सवाल अरविंद सावंत यांना प्रकाश जावडेकर यांना विचारला.
प्रकाश जावडेकर यांचा अशाप्रकारे तोल गेला याचेच मला आश्चर्य वाटते. सहसा ते अशाप्रकारचे वक्तव्य करत नाहीत, पण ते दुर्दैवाने असं बोललं असतील, असं अरविंद सावंत म्हणाले.
शिवसेनेला गद्दारी हा शब्द लागूच पडत नाही. ‘प्राण जाये पर वचन न जाये’, अशी शिवसेना आहे, असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
2021 सालची जनगणना ही जातनिहाय व्हावी- रामदास आठवले
…हे पाहून अंगी बारा हत्तीचं बळ आलंय- राजू शेट्टी
…म्हणून शरद पवार संतापले अन् चालू पत्रकार परिषदेतून माझी चूक झाली असं म्हणत गेले निघून!
ज्या देशातील शेतकरी दु:खी आहे, तो देश कधीच प्रगती करु शकत नाही- उर्मिला मातोंडकर
Comments are closed.