देश

युती तुटताच केंद्रिय मंत्री राहिलेले अरविंद सावंत यांची भाजपवर जोरदार टीका; म्हणतात…

नवी दिल्ली |  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका रात्रीत 2700 झाडांची कत्तल करण्यात आली आणि आपण चर्चा करतो प्रदूषणावर, वातावरण बदलावर..  सरकारकडे काही नियोजन आहे का? अशा शब्दात दिल्लीच्या प्रदूषण तसंच आरेविषयी प्रश्न उपस्थित करत शिवसेना खासदार आणि माजी केंद्रिय मंत्री अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.

आपण वातावरण बदलावर चर्चा करतो. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याबाबत कधी विचार केला नाही. बॅटरीच्या गाड्या येत आहेत. हा कचरा कुठे फेकला जाईल याचा कधी विचार केला आहे का? सरकारकडे याबाबत काही नियोजन आहे का? असा प्रश्न त्यांनी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना विचारला.

दिल्लीचं प्रदूषण हा एवढा गंभीर मुद्दा बनला असताना लोकसभेत अगदी बोटावर मोजण्याएवढेच खासदार या विषयावर बोलण्यासाठी उपस्थित होते. फक्त 18 टक्के खासदारांची या चर्चेसाठी उपस्थिती होती, ज्यात अरविंद सावंत यांनीही सहभाग घेऊन मुंबईचं प्रतिनिधित्व केलं.

दरम्यान, युती तुटल्यानंतर शिवसेना खासदारांनी आक्रमक रूप धारण केलं आहे. दोन दिवसांपूर्वी सेनेने संसदेच्या बाहेर महाराष्ट्रातील अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि वाढिव मदत मिळावी म्हणून आंदोलन केलं होतं.

 

सर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, माणिकबाग, पुणे

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या