मुंबई | महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, काँग्रेसचे नेते देखील अयोध्येत दाखल झाले आहेत.
आमचं हिंदुत्व कायम असून, आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही. राममंदिरासाठी शिवसेनेची भूमिका कायम महत्वाची राहिली आहे, असं म्हणत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते अयोध्येत बोलत होते.
सरकार स्थापन होण्यापूर्वीही उद्धव ठाकरे अयोध्येत आले होते. आज मुख्यमंत्री म्हणून येत आहेत, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, श्री राम नगरी अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी फैजाबाद आणि अयोध्येत सर्वत्र बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे अयोध्येत भगवं वातावरण पाहायला मिळत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांकडून झाली ‘ही’ चूक
कोरोनाचा आत्तापर्यंतचा सर्वात धक्कादायक व्हिडीओ!
महत्वाच्या बातम्या-
“मी बोलते ते मीच बोलते….. ना की देवेंद्र फडणवीसांची बायको म्हणून”
“जयंत पाटील ‘मुनगंटीवार के हसीन सपने’ पुस्तक लिहितील अन् त्याची प्रस्तावना मी लिहीन”
कलाविश्वात जातीयवाद आताचा नाही…त्यासाठी काही माणसं कार्यरत- विक्रम गोखले
Comments are closed.