बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…अन्यथा भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”

मुंबई | अदर पूनावाला यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. माणसाचा जीव वाचवण्याचं काम ते करतात, ते ही महाराष्ट्रात. याचा आम्हाला आदर आहे. शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही, अशा शब्दात शिवसेनेवर केल्या जाणाऱ्या आरोपांना खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पूनावाला यांना धमक्या देऊन आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचं काम कसं करणार? शिवसेनेची बदनामी करण्यासाठी आरोप केला जात आहे. शिवसेनेनं धमकी दिलेली नाही. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या उक्तीप्रमाणे यांना सत्तेवर येण्याची घाई झाली आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी भाजपवर केली आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर विरोधकांना जर राज्यात सत्तांतर होईल असं वाटत असेल तर बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांवरुन केंद्र सरकारनेही राजीनामा दिला पाहिजे. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारणार का?, असा सवालही सावंत यांनी भाजप नेत्यांना केलाय.

पश्चिम बंगालच्या जनतेनं यांना धडा शिकवला. जो महाराष्ट्राने आधीच दिला होता, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेलाही सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भाजप शिवसेनेच्या कुबड्यावर होता. आमच्याच कुबड्या आणि शिडी वापरुन भाजप महाराष्ट्रात वाढला. अन्यथा भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता, असं अरविंद सावंत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक

“सीरम’ने काहीही करून महाराष्ट्राला लस देताना झुकतं माप द्यावं”

ऑक्सीजनच्या कमतरतेवरून सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारला झापलं, म्हणाले…

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याबाबत तात्याराव लहानेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

भारतात कोरोना स्थितीचा वाईट काळ येणं अजून बाकी आहे- सुंदर पिचाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More