बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सावंत म्हणतात, ‘हा तर ‘ठाकरे’ घराण्याचा करिष्मा’

नवी दिल्ली | गुरुवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा ठाकरे घराण्याचा करिष्मा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मनोहर जोशी जेव्हा शपथ घेत होते त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खाली बसले होते आणि मी आता शपथ घेतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खाली बसले होते. हा ठाकरे घराण्याचा मोठा करिष्मा म्हणावा लागेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

जे करायचं आपण पण त्याचा आस्वाद घ्यायचा नाही, हा किती मोठा त्याग आहे, किती मोठं मन असेल त्यांचं, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

मंत्रिपदाची शपथ घेताना शिवसेनाप्रमुख जवळ आहेत असं वाटत होतं. त्यांनी मला ही संधी दिली आहे. आज साहेब हवे होते. डोकं त्यांच्या पायावर ठेवलं असते, असा निस्वार्थी नेता मी आजपर्यंत पाहिला नाही, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-सायकलवर फिरणाऱ्या ‘या’ नेत्याला नरेंद्र मोदींनी बनवलं मंत्री!

-शरद पवारांना पाचव्या रांगेत जागा, पवार शपथविधीला गेलेच नाहीत!

-प्रकाश आंबेडकरांना पराभूत करणाऱ्या ‘या’ खासदाराने घेतली मंत्रीपदाची शपथ

-…अन् यावेळी रामदास आठवलेंनी न चुकता घेतली मंत्रीपदाची शपथ

-रावसाहेब दानवेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ; प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी??

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More