महाराष्ट्र मुंबई

‘औरंगजेब तुमचा आदर्श आहे का?’; शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

मुंबई | औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. त्याला काँग्रेसकडून मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय?, असा सवाल काँग्रेस नेत्यांना केला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं घोषित केलं आहे. तेव्हापासून हा लढा सुरु आहे. शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळायला हवी होती. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. पण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे. कोरोनामुळे राहिलं होतं पण आता हे काम होई, असा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.

दरम्यान, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसचे नेते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाच मुलीने भोसकलं!

“सोनिया गांधी आणि मायावतींना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करा”

काँग्रेसमध्ये भूकंप? निम्म्यापेक्षा अधिक आमदार पक्ष सोडणार असल्याचा काँग्रेस नेत्याचाच दावा

औरंगाबाद की संभाजीनगर?; काँग्रेस नेते म्हणतात, “हा वाद निरर्थक आणि राजकीय”

बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध डिझायनरनं केला लिंगबदल; सोशल मीडियावर केली पोस्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या