मी शिवसैनिक आहे, आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाही- अरविंद सावंत
नवी दिल्ली | खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रातील प्रश्न संसदेत उपस्थित केल्यामुळे अरविंद सावंत यांनी आपल्याला संसदेच्या लॉबीत धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी धमकावल्याचं नवनीत राणा यांी
अरविंद सावंत यांच्या विरोधात नवनीत राणा यांनी तक्रार केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून याप्रकरणी कारवाईची मागणी नवनीत राण यांनी केली आहे.
नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा यांनी केलेला आरोप सावंतांनी फेटाळून लावला आहे. नवनीत राणा यांनी केलेला आरोप साफ खोटा आहे, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. एकतर त्या महिला आहेत आणि मी शिवसैनिक आहे. आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाहीत. तसेच नवनीत राणा यांची बोलण्याची पद्धत बरोबर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांची बोलण्याची पद्धत, शैली ही अतिशय घृणास्पद असते. आजही त्या त्याच पद्धतीने बोलत होत्या, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“व्वा रे बहाद्दर…महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय?”
“पोलीसांची खाती स्वत:च्या बायकोच्या बँकेत वर्ग केली तेव्हा फडणवीसांनी राजीनामा दिला होता का?”
गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांवर डॅशिंग IPS कृष्ण प्रकाश म्हणाले…
ही कोणती ‘शर्यत’? सांगलीत बैलगाडा शर्यतीत बैलांना बॅटरीने शाॅक देत मोठ्या काठीने जबर मारहाण
…तर आधी स्वत: खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा- रुपाली चाकणकर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.