‘दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव’; अरविंद सावंत संतापले
मुंबई | मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा मिळाल्यावर उद्योगपती अदानी यांनी विमानतळाच्या बाहेर लावलेल्या फलकामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या नामफलकाची तोडफोड केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अदानींनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या टी-शर्ट्सवर अदानी विमानतळ लिहिलं आहे. दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं महाराजांचं नाव शर्टच्या हातावर आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते.
सांगूनही जेव्हा दुर्लक्ष केलं जातं तेव्हा अशी प्रतिक्रिया दिली जाते. तो काय अदानी विमानतळ आहे का, याआधी असणाऱ्या जीव्हीकेने असे बोर्ड लावले होते का?, असा सवालही सावंत यांनी केला. त्यासोबतच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचं त्यांनी समर्थन केलं आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली होती.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ एखाद्या उद्योगपतींच्या नावाने ओळखलं जात असेल तर ते मान्य नाही. त्यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं. ते फक्त महाराजांच्या नावानेच ओळखलं जावं, असं संजय राऊत म्हणाले होते.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा काय सुरू, काय बंद?
दोन दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठे बदल, वाचा ताजे दर
ह्रदयद्रावक! पुण्याच्या वेदिका शिंदेचा अखेरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
अखेर मुहूर्त ठरला! उद्या दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल होणार जाहीर
सावधान राहा! ‘हे’ पाच पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका, कारण…
Comments are closed.