बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्या खरंच गायकाला डेट करते का?; आर्या आंबेकरचा खुलासा

मुंबई | महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर सध्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शो मध्ये जजची भूमिका साकारत आहे. 2008 साली झी मराठीवर झालेल्या याच शो ने आर्याला खरी ओळख मिळवून दिली. काही दिवसांपासून आर्या सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध गायक आणि संगितकाराला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आता या चर्चेवर आर्या आंबेकरनी मौन सोडलं आहे. या संदर्भात आर्यानी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

मी एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छिते की, ते माझे मार्गदर्शक आहेत. काहीही अफवा असल्या तरी मी त्यांचा कायम आदर करत आले आहेत. पूढेही करेल, मला त्यांचं कौतुक वाटतं, असं आर्याने म्हटलं आहे.

आर्या आंबेकरने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील गाणी गायली आहेत. गोड गळ्यासोबतच तिच्या सौंदर्याने देखील भूरळ घातली आहे. गेल्या 12 वर्षांपासून कोणतीही टॅलेंट एजन्सी मला मॅनेज करत नाही आहे.  इंन्स्टाग्राम आणि फेसबुक वरील माझे सर्व फॉलोअर्स हे खरे आहेत. तसेच युट्युबवरील सबस्क्रायबर भरपूर आहेत. परंतु याचा मला काहीच फरक पडत नसल्याचं पोस्ट मध्ये आर्यानं म्हटलं आहे.

दरम्यान, 2017 साली प्रदर्शित झालेल्या ‘ती सध्या काय करते’ या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाला सुरूवात केली आहे. आर्याला संगिताचा वारसा तिच्या कुटुंबाकडूनच मिळाला आहे. त्यामुळे आर्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

राजु शेट्टींची एक हाक, तीन दिवसात आले मिस्डकॉल सव्वादोन लाख

‘राष्ट्रवादी पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा नाही तर…’; सुरेखा पुणेकरांचं दरेकरांना प्रत्युत्तर

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकार काढणार अध्यादेश

….म्हणून श्रीपाद छिंदमला पुन्हा अटक, ‘त्या’ प्रकरणामुळे अडचणीत!

देशात डेंग्यूचं थैमान! तब्बल ‘इतक्या’ हजार लोकांना डेंग्यूची लागण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More