बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आर्यन-गौरी, अन्यना पांडे परदेशी रवाना

मुंबई | भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील भर पडत आहे. या कारणामुळे राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक गोष्टी बंद केल्या असून बाॅलिवूड सेलिब्रिटेंचं काम देखील बंद आहे. यामुळे अनेक बाॅलिवूड स्टार्स परदेशात सुट्ट्यांसाठी गेले आहेत. अशातच आता अणखी तीन जणांची भर पडून ते देखील परदेशी रवाना होत असल्याचं समोर आलं आहे.

शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि त्यांचा पुत्र आर्यन खान परदेशी रवाना होत असताना त्यांना एअरपोर्टवर स्पाॅट करण्यात आलं आहे. यादरम्यान गौरी आणि आर्यनही न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. तसेच अन्यना पांडे देखील परदेशी रवाना होताना स्पाॅट करण्यात आली आहे. अन्यना तिच्या कुटुंबासह न्यूयाॅर्कला रवाना झाली आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत असून गौरी आणि आर्यन न्यूयॉर्कला जाऊन तिच्यासोबत राहणार आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भैयानीने या सगळ्यांना एअरपोर्ट वर स्पाॅट केलं असून त्यांचा व्हिडीओ देखील शूट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र बाॅलिवूड सेलिब्रिटींना ट्रोल करण्यात येत आहे. देशावर संकट आल्यावर देशातून पळ काढणाऱ्या या लोकांना देशातून हकलून द्या अशा कमेंट्स या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, कोरोनातून बरे होताच बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर हे दोघे देखील न्यूयाॅर्कला गेले आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटी मालदीवला त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री श्रुती हासनने देखील देशाबाहेर जाणाऱ्या सेलिब्रिटींवर संताप व्यक्त केला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या-

कौतुक करावं तेवढं कमी! मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम त्या अंध मातेला देणार

‘हे केंद्र सरकारचं काम नाही, जबाबदारी राज्यावर सोपवावी’; राज ठाकरेंचं मोदींना दुसरं पत्र

ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत आम्ही पाया देखील पडायला तयार- राजेश टोपे

महाराष्ट्राला 20 कोटी लस मिळणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अदर पुनावालांशी चर्चा

‘या समाजाचा भाग असल्याची लाज वाटते’; उच्च न्यायालयानं ठाकरे सरकारला फटकारलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More