बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह ‘या’ सात जणांना तुरूंगाची हवा!

मुंबई | मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरण सध्या चांगलच चर्चेत आलं आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या त्याची एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. अशातच आर्यननं ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

शनिवारी रात्री टाकलेल्या धाडीत एनसीबीनं 10 जणांना ताब्यात घेतलं होतं. मात्र रात्री त्यांनी कोणाला ताब्यात घेतलं हे सांगितलं नव्हतं. आता शाहरुखच्या मुलाचं नाव समोर आलं असून एनसीबीकडून त्याची चौकशी सुरु होती. आज दुपारनंतर आर्यन आणि अन्य साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

एनसीबीकडून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे अनुक्रमे आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा अशी आहेत.

दरम्यान, एनसीबीकडून या सर्वांची कसून चौकशी चालू आहे. अरबाज मर्चंटने आर्यनला पार्टीसाठी क्रुझवर आमत्रंण दिलं होतं. मोहक, नुपूर आणि गोमित सर्व दिल्लीचे राहिवाशी आहेत. मोहक एक फॅशन डिझायनर आहे. तसेच नुपूर देखील याच डिझायनींग व्यवसायाशी संबंधित आहे. तर, गोमित हेअर स्टाईलीश आहे. या सर्वांना अटक केली असुन त्यांचा तुरूंगात मुक्काम आहे.

थोडक्यात बातम्या – 

सोमवारपासून राज्यात शाळेची घंटा वाजणार! सरकारने केली’ ‘ही नवीन नियमावली जाहीर

ममता बॅनर्जींकडून पराभूत झालेल्या प्रियंका टिबेरवाल म्हणतात…’मीच या खेळाची मॅन ऑफ द मॅच…’

धोका वाढला! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हयात कोरोनामुळे पुन्हा 61 गावांमध्ये कडक लॉकडाउन

भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल!

किंगखानच्या लेकाच्या अडचणीत वाढ! ड्रग प्रकरणात न्यायालयाने दिला हा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More