बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खानला जामीन मंजूर पण न्यायालयात नेमकं काय झालं; वाचा सविस्तर

मुंबई | क्रुझ पार्टी ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. गेल्या 26 दिवसांपासून आर्यन खानला जामीन मिळवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान प्रयत्नशील होता. आता काही अटी आणि शर्तींवर आर्यन खानला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ विधीतज्ञ मुकूल रोहतगी यांनी युक्तीवाद केला होता.

बुधवारी 27 ऑक्टोबरला याचिकाकर्त्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. मात्र, वेळेअभावी एनसीबीचा युक्तीवाद राहिल्याने पुढील सुनावणी गुरूवारी 28 ऑक्टोबरला करण्यात आली. वकिल अनिल सिंग यांनी एनसीबीकडील पक्षाचा युक्तीवाद केला आहे. अनिल सिंग यांनी युक्तीवादात म्हटलं आहे की, क्रुझवरील आठ व्यक्तींकडे ड्रग्ज मिळाले होते. त्या सर्वांचे व्हाट्सएप चॅट मिळाले आहेत आणि पंचनाम्यात याची नोंदही आहे.  हा  11 व्यक्तींचा ग्रुप क्रुझवर भेटणार होता. याकारणामुळे ड्रग्ज व्यक्तीगत सेवनासाठी बाळगले होते असं म्हणता येणार नाही. यास्तव एनसीबीकडून या सर्व आरोपींवर कटकारस्थान कलम 28 आणि 29 लावलं आहे, असा युक्तीवाद एनसीबीचे वकिल अनिल सिंग यांनी केला आहे.

आर्यन खानसोबत असलेल्या इतर व्यक्तींनी अमली पदार्थ सेवनाचा प्रयत्न केला नसला तरी मुद्दामून ड्रग्ज बाळगल्याने एनडीपीएस या कायद्याचे कलम 28 लागू होतं आहे. ड्रग्ज सेवन केलं नसल तरी ते जवळ बाळगल्याने कलम 28 लागू होतं. कटाचा प्रकार असल्याने कलम 37 आपोआप लागू होते. त्यामुळे हा गंभीर गुन्हा आहे, असाही युक्तीवाद अनिल सिंग यांनी केला आहे.

यावेळी आर्यन खानच्या पक्षाकडील युक्तीवाद मुकुल रोहतगी यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, क्रुझवर 1300 लोक होते. अरबाज आणि अचित व्यतिरिक्त आपण कोणाला ओळखतो हे दर्शविण्याकरिता एनसीबीने कुठलेही पुरावे सादर केले नाहीत. अचितला 2.4 ग्रॅम ड्रग्जमुळे अटक करण्यात आली आहे. डिलर्सकडे फक्त 2.4 ग्रॅम ड्रग्ज असूच शकत नाही. त्याचप्रमाणे एनसीबीकडे कट रचल्याचा कुठलाही पुरावा नाही, असा युक्तीवाद मुकुल रोहतगी यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“दाऊद तर पाकिस्तानात आहे, मग तो इकडे कसा येऊ शकतो”

‘तुषार भोसले माफी मागा नाहीतर…’; ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक

‘एक बाप म्हणून मी खूप…’; आर्यन खानच्या जामिनानंतर आर. माधवनचं ट्विट

अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; दिवाळीआधी प्रवाशांना मोठा दिलासा

“मोहम्मद आमीरची इतकी औकात नाही की, मी त्याच्याबद्दल बोलावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More