बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्याचं आडनाव ‘खान’ असल्यानं त्याला त्रास दिला जातोय”

नवी दिल्ली | मुंबईच्या एका क्रुझवरून सुरू झालेलं ड्रग्ज प्रकरण आता दररोज नविन वळण घेत आहे. प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात अडकला आहे. ड्रग्ज प्रकरणी झालेल्या कारवाईला आता राजकीय आणि धार्मिक रंग येत आहे. आर्यन खान मुस्लीम असल्यानं या प्रकरणात त्याला गोवल्याचा गंभीर आरोप पिडीपीच्या नेत्या महेबूबा मुफ्ती यांनी केला आहे.

आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर ड्रग्ज प्रकरणी अनेक आरोप आहेत. आर्यन खानच्या समर्थनार्थ अनेक राजकीय नेते मैदानात उतरले आहेत. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याचं वक्तव्य केलं आहे. आर्यन खानचं आडनाव खान असल्यानं त्याच्यामागं तपास यंत्रणा लावण्यात आल्याची टीका मुफ्ती यांनी केली आहे.

अवघ्या 23 वर्षांच्या मुलावर ‘तो’ खान असल्यानंच अन्याय करण्यात येत असल्याची खंत मुफ्ती यांनी व्यक्त केली आहे. भाजप आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी आर्यन खानवर कारवाई करत आहे, अशी टीका मुफ्ती यांनी भाजपवर केली आहे. लखीमपूर घटनेतील दोषींवर कारवाई करण्याऐवजी तपास यंत्रणा एका मुलावर अन्याय करत आहेत. ही तर न्यायाची विटंबना असल्याचं वक्तव्य महेबूबा मुफ्ती यांनी केलं आहे.

दरम्यान, लखीमपूर घटना आणि आर्यन खानवरील कारवाई या दोन्ही घटनांवर मुफ्ती यांनी आपली मतं मांडली आहेत. मुंबईत एका क्रुझवर एनसीबीच्या कारवाईत आर्यन खानला पकडण्यात आलं होतं. या प्रकरणाला हिंदू आणि मुस्लीम असा रंग देण्याचा प्रयत्न सध्या होताना दिसत आहे.

पाहा ट्विट 

 

थोडक्यात बातम्या

…म्हणून वाढदिवसादिवशी महानायकाने घेतला ‘या’ जाहिरातीतून बाहेर पडण्याचा निर्णय

तालिबान्यांसाठी धोक्याची घंटा! ‘तात्काळ ‘हा’ परिसर खाली करा’; अमेरिकेचा नागरिकांना इशारा

भाजपला मोठा धक्का! ‘या’ विद्यमान मंत्र्याने केला काॅंग्रेसमध्ये प्रवेश

फक्त 6 रुपये घेऊन मुंबईत आला, मात्र त्यानंतर ‘मिस्टर बजाज’ने गाजवली बाॅलिवूड इंडस्ट्री

‘कुणी मला सांगेल का?, आज वसुली चालू आहे की बंद?’; अमृता फडणवीसांचा खोचक टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More