बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यनला ज्या पार्टीतून उचललं ‘त्या’ पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ!

मुंबई | देशभर एकच चर्चा आहे ती म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानच्या मुलाला अटक झाली आहे. मुंबईतील क्रुझ पार्टीमध्ये एनसीबीने छापा टाकला त्यावेळी तिथे शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानही उपस्थित असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. एनसीबीने केलेल्या चौकशीनंतर त्याला ताब्यात घेतलं होतं. अशातच क्रुझवरील त्या पार्टीचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे.

मला या पार्टीतील ड्रग्जबाबत कोणतीही माहिती नव्हती, मला अतिथी म्हणून पार्टीला बोलावलं होतं, असं चौकशीवेळी आर्यनने सांगितलं. मात्र त्याच्याकडे पार्टीला अतिथी म्हणून कोणतीही आमंत्रण पत्रिका दिली नव्हती. तो फक्त सांगत आहे की मसा अतिथी म्हणून बोलावलं होतं मग त्याला कोणी पार्टीमध्ये नेलं याचा तपास एनसीबी करत आहे.

अरबाजकडे ड्रग्ज सापडले होते, मात्र आर्यनकडे जरी ड्रग्ज सापडले नसले तरी ते अरबाजने आपल्या मित्रांसाठी आणले होते. याचा सबळ पुरावा असा की त्यांची व्हाट्सअॅप चॅट, त्यामधून लक्षात आलं की ते या ड्रग्डचे सेवन करणार होते.

दरम्यान, देशभरात या प्रकाराची चर्चा आहे, महत्त्वाचं म्हणजे अरबाजने मान्य केलं की, तो गेली चार-पाच वर्ष ड्रग्ज घेत होता. या ड्रग्ज त्याने विविध देशात घेतल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे किंग खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

”घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्ष बोंबलत बसा”

‘आता वेळ आली आहे, मी लखीमपूर खेरी येथे जाणार’; असदुद्दीन औवेसी आक्रमक!

#लखीमपूर | “कोणा व्यक्तीचा जीव जात असेल, तर त्यास जबाबदार कोण?”

शाहरूखच्या लेकाच्या अडचणीत वाढ???; आर्यन खानला होऊ शकते 10 वर्षाची शिक्षा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More