बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ड्रग्स बाळगण्याप्रकरणी आर्यन खानला ‘इतक्या’ दिवसाची न्यायालयीन कोठडी

मुंबई | क्रुझ ड्रग्ज प्रकरणाबाबत अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. आर्यन खानच्या बाजूने न्यायालयात अॅड मानेशिंदे बाजू मांडत आहेत. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग केस लढवत आहे. आर्यन खानसह 7 जणांच्या न्यायालयीन कोठडीबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे.

अंमली पदार्थविरोधी पथकाने क्रुझवर टाकलेल्या धाडीत आर्यन खान आढळून आल्याने देशात एकच खळबळ उडाली. आर्यन खानसह 7 आरोपींवर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायलयाने आर्यन खानसह 7 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.

आर्यन खानला न्यायालयात हजर केल्यानंतर सुरुवातीला 1 त्यानंतर 3 दिवसांची मिळून एकूण 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. एएसजी अनिल सिंग यांनी आर्यन खानच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आर्यन खानच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, उद्या शुक्रवारी आर्यन खानच्या जामीनावर न्यायलयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्र तुंरुगातच जाणार आहे. तसेच आर्यन खानला जामीन मंजूर होतं की नाही, याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या-

क्लासी राहुलच्या वादळी खेळीने पंजाबच्या आशा पुन्हा जिंवत; तब्बल ‘इतक्या’ षटकारांची केली आतषबाजी!

वरूण गांधींना मोठा धक्का! शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं कार्यकारिणीतून डच्चू

‘अजित पवारांच्या कंपन्यांवर टाकलेल्या धाडीवरून स्पष्ट होतं की…’; मलिकांचा गंभीर आरोप

“उद्धवजींची बोली अन् बंदुकीची गोळी एकसारखीच, त्यांचा आदेश आला की…”

“पवार घराण्याला महाराष्ट्र लुटायचा काय ठेका दिलाय का?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More