बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्हालाही माझा अभिमान वाटेन”; आर्यन खानने समीर वानखेडेंना दिलं ‘हे’ वचन

मुंबई | बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड कारागृहामध्ये कैद आहे. शनिवारी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला चाललेल्या कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने केलेल्या छापेमारीत आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं होतं. आता आर्यनबद्दल एक अत्यंत मोठी घडामोड समोर आली आहे.

एनसीबीच्या कोठडीत असताना आर्यनने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना एक वचन दिलं असल्याची माहिती समोर येत आहे. मी यापुढे चांगलं काम करेन आणि एक दिवस तुम्हालाही माझा अभिमान वाटेल, असं वचन आर्यन खानने समीर वानखेडे यांना दिले असल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रकाशित झाली आहे. सध्या या बातमीची चर्चा होताना दिसत आहे.

मी तुरुंगातून सुटल्यानंतर एक चांगला व्यक्ती होईन. तसेच मी जे कोणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, अशा लोकांना मदत करेन, असं आर्यन म्हटल्याचं कळतंय. एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यनची एनसीओद्वारे समुपदेशन करण्यात आलं, यावेळी काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक उपस्थित होते, अशी माहिती आहे. या समुपदेशनावेळीच त्याने ही आश्वासनं दिल्याचं कळतंय.

दरम्यान, शनिवारी 2 ऑक्टोबरला मध्यरात्री मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने छापा टाकला होता. यावेळी आर्यन खानसह इतर सात जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या अटकेची कारवाई एनसीबीकडून करण्यात आली. या बातमीमुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती. आर्यन खान सध्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहामध्ये कैद आहे.

थोडक्यात बातम्या-

का वाढतोय कॅन्सरचा धोका?, अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर

‘या’ 22 जिल्ह्यांना आज पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

अखेर काँग्रेसचा अध्यक्ष ठरला, कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“पंजाबला अशांत होऊ देऊ नका, आपण इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत मोठी किंमत मोजली”

नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More