बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खान घरी जाणार की रवानगी पुन्हा कोठडीत होणार? आज होणार निर्णय

मुंबई | कॉर्डेलिया क्रुझवर कारवाई करत एनसीबीने शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतलं. या ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीनं आर्यन खान, मूनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटसह 8 जणांना ताब्यात घेतलं. ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन, मूनमून आणि अरबाजची एनसीबी कोठडी आज संपत आहे. या तिघांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यनसह मूनमून आणि अरबाजला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. आर्यन खानचा जामीन मंजूर होणार की, त्याची पाठवणी पुन्हा कोठडीत होणार याचा निर्णय आज होणार आहे.

आर्यन खानच्या अटकेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रीया समोर येत आहेत. मुलगा कोणाचाही असला तरी ड्रग्ज या प्रकरणी त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असं परखड मत अनेक नेत्या अभिनेत्यांनी मांडलं आहे. तर अनेक सेलिब्रेटींनी आर्यन खानची बाजू घेतली आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय घेणार? आणि न्यायालयाच्या निर्णयाने प्रकरणाला कोणतं नवीन वळण लागणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

एनसीबीच्या पथकानं मोठ्या शिताफीने कॉर्डेलिया क्रुझवर कारवाई केली आणि या ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतल्यावर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने आर्यन खान, मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंटला 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपत असल्याने त्या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

राज्यभरातील मंदिराचे दरवाजे उघडले पण ‘या’ 6 मंदिरासाठी मात्र कलम 144 लागू

“जेव्हा बार उघडले तेव्हा…; भवानी आणि मुंबादेवीला काय उत्तर देणार ठाकरे सरकार?”

शेवटी आईच ती! आर्यनला कोठडीत घेऊन गेली बर्गर

बापरे! सर्वसामान्यांचा ताण वाढला, गॅस आणि पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले

अखेर मंदिरांची दारं उघडली; असा करता येणार मंदिरात प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More