बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् शाहरूख खानला झाला ‘त्या’ नियमांचा फायदा! आर्यनला धीर देत शाहरूख म्हणाला…

मुंबई | क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. आर्यन खानची सध्या मुंबईच्या आर्थर रोडच्या तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. तेव्हा आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरूख खान गेला होता. तेव्हा त्यांच्या या भेटीत तब्बल 15 ते 20 मिनिटे संवाद झाला.

आर्थर रोडवरील तुंरूग पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरूख खान जेव्हा आर्यन खानला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी शाहरूख खानचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तपासण्यात आले. त्यानंतर त्याला तुरूंगात प्रवेश देण्यात आला. शाहरूख खानसोबत तिची मॅनेजर पूजा ददलानी देखील उपस्थित होती. तसेच शाहरूख-आर्यनच्या वेळी त्या ठिकाणी 5 पोलीस अधिकारीही उपस्थित होते. शाहरूख- आर्यनमध्ये 15 ते 20 मिनिटाचा संवाद झाला, त्या संवादमध्ये शाहरूख आर्यनला धीर देत म्हणाला की, काळजी करू नकोस, जामीन लवकरात लवकर मिळेल. प्रकरण उच्च न्यायालयात आहे. या भेटीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.

कोरोना काळात कैद्यांना भेटण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र कोरोनाचा धोका कमी होताच नियमात शिथिलता देण्यात आली, त्याचाच फायदा शाहरूख खानने घेतला. त्याआधी कैद्यांना फक्त फोनवरूनच संवाद साधायला परवानगी दिली जात होती. तेव्हा शाहरूख खान आणि गौरी आर्यनशी फोनवरून सवांद साधत होते.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणावरून सध्या देशात राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे. या प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर देखील राज्यातील मंत्र्यांनी टीका केली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.

थोडक्यात बातम्या-

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

“…लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद”

मोठी बातमी! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? नारायण राणेंनी केला मोठा गौप्यस्फोट

खासदार रक्षा खडसेंना जिल्हा बँकेच्या निवडणुकीपुर्वीच मोठा धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More