बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी

मुंबई | मुंबई क्रुझवर एनसीबीनं छापा टाकत अनेकांना ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आलं. चौकशीमध्ये झालेल्या खुलास्यांमुळे त्याला अटक करण्यात आलं. अटकेनंंतर आर्यन आता मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. अशातच आज त्याच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.

आर्यन खानच्या जामीनासाठी त्याचे वकिल सतीश मानशिंदे यांनी याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई सत्र न्यायालयानं तो जामीन अर्ज फेटाळत आर्यनला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावली होती. त्याच्या सुटकेसाठी त्याचे वकिल मानशिंदे अतोनात प्रयत्न करत आहे.

आता आर्यन खानच्या वतीने जामीन प्रकरणात मी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहीन, अशी माहिती भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी दिली. त्यामुळे आता आर्यनला जामीन मंजूर होणार की नाही याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, 29 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच पुढील तीन दिवसांत आर्यनच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली नाही तर त्याला दिवाळीही जेलमध्येच घालवावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्णय झाला नाही तर आर्यनला 15 नोव्हेंबरपर्यंत जेलमध्येच रहावं लागू शकतं.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना?, महाविकास आघाडीला ‘या’ गोष्टीची भीती

“…तोपर्यंत समीर वानखेडे यांनी राजीनामा द्वावा”

एनसीबीमधील ‘Special-26’चा खुलासा होणार; नवाब मलिक लवकरच करणार नवा गौप्यस्फोट

WANTED! किरण गोसावीच्या अडचणी वाढल्या, पुणे पोलिसांनी उचललं ‘हे’ पाऊल

पुण्यातील ‘हा’ गंभीर मुद्दा गेला थेट नितीन गडकरींच्या दरबारी; महापौर भेटीसाठी जाणार दिल्लीला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More