बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् वकिलांच्या ‘या’ जबरदस्त युक्तिवादामुळे आर्यनचा जामीन झाला मंजूर

मुंबई | एनसीबीने मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर कारवाई केली आणि अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला ताब्यात घेतलं. ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आर्यन खानला तब्बल 26 दिवसानंतर जामीन मंजूर झाला. जामीन मिळवण्यासाठीच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आर्यनची काल कोठडीतून सुटका झाली. आर्यनच्या सुटकेसाठी त्याच्या वकिलांचा युक्तिवाद निर्णायक ठरला.

एनसीबीकडून करण्यात आलेल्या आरोपांना फोडून काढत आर्यनचे वकिल मुकुल रोहतगी यांनी जबरदस्त युक्तिवाद केला. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर आर्यन खान प्रकरणाची सुनावणी पार पडली. यादरम्यान एनसीबीकडून सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार युक्तिवाद सुरू होता. आर्यन खानचा ड्रग्ज रॅकेटमध्ये कशा प्रकारे सहभाग आहे, हे सांगताना त्यांनी अनेक दाखले देखील दिले आणि आर्यन, अरबाज, मूनमूनच्या जामीनाला कडाडून विरोध केला.

त्यानंतर मुकुल रोहतगी यांचा प्रत्युत्तरादाखल युक्तिवाद सुरू झाला. ते म्हणाले की, क्रुझवर असलेल्या 1300 जणांमध्ये आर्यनचा संबंध हा केवळ अरबाज मर्चंट आणि अचित कुमार या दोघांशीच दाखवण्यात आला. एनसीबीनुसार कटकारस्थान करण्यात आलं पण आर्यन कटात सहभागी असल्याचा कोणताच पुरावा नाही. आर्यनला क्रुझवर आमंत्रित केलेल्या गाबा आणि मानवलापण एनसीबीने अटक केली नसल्याचं रोहतगी म्हणाले.

एनसीबीने अटक केलेले आठही जण मित्र असते तर त्यांच्यावर कटात सहभागी असल्याचा आरोप केला जाऊ शकतो. पण इथे तसं काहीच नाही. त्यामुळे कट सिद्ध करणे अवघड असल्याचा युक्तिवाद रोहतगी यांनी केला. रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद करत एनसीबीचे सगळे मुद्दे हाणून पाडले आणि विशेष म्हणजे रोहतगी यांचा युक्तिवाद सुरू असतानाच आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांचा जामीन मंजूर झाला.

थोडक्यात बातम्या-

सोशल कनेक्शनच्या नव्या पर्वाला सुरूवात! फेसबुकचं नाव बदललं

“शिवसेनेचं हिंदुत्व नितेश राणेंच्या जन्माच्या अगोदरपासून, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही”

“मला कधी कधी वाटतं मोदी आणि गडकरी यांच्यात स्पर्धा सुरू आहे”

‘…म्हणजे निश्चितच काहीतरी काळंबेर आहे’; नवाब मलिक आक्रमक

केंद्राकडून राज्यांना जीएसटी निधी जारी; महाराष्ट्राला मिळाले ‘इतके’ हजार कोटी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More