ड्रग्ज प्रकरणात हिंदू महासंघांची एंट्री; आर्यन खानच्या अडचणीत वाढ

मुंबई | बाॅलिवूड (Bollywood) मध्ये ड्रग्ज प्रकरण आता नित्याचं झालं आहे. त्यातल्या त्यात याप्रकरणाला अभिनेता सुशांत सिंग (Sushant Singh) च्या मृत्यूप्रकरणानंतर जोर आला आहे. आजही अनेक अभिनेते-अभिनेत्री सध्या याप्रकरणात अडकले आहेत.

यातच अभिनेता शाहरुख खानचा (ShahRukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनेक महिन्यांची कारवाई आणि चौकशीनंतर तो निर्दोष असल्याचं सिद्ध झाले आणि त्याची सुटका करण्यात आली होती.

त्यांच्या या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात (High Court) आव्हान देण्यात आलं आहे. याबद्दल बोलताना हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे आणि अॅॅड सुबोध पाठक म्हणाले, “आर्यन खानला घटनास्थळी मुंबई अमली पदार्थ विभागाने रंगेहात पकडल होते.”

त्यावेळी आर्यन खानला त्याचा गु्न्हा मान्य होता. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी देखील ते मान्य केलं होतं. यामुळे सत्र न्यायालयाने दोन वेळा आर्यन खानचा जामीन (Bail) देखील दोनवेळा नाकारण्यात आला होता.

इतकं सगळ असून देखील तपास यंत्रणांनी सबळ पुरावे नसल्याचं कारण देत त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यांनी जे केलं ते अधिकार क्षेत्राच्या बाहेरचं होतं. याप्रकरणात पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत की नाहीत हे न्यायालयाच्या खटल्या दरम्यान ठरवलं जाणार आहे. तो न्यायालयाचा अधिकार आहे.

पोलिसांनी मात्र आरोपीला निर्दोष मुक्त करण्याच्या अधिकारावर आक्रमण केलं आहे, असं ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाला विरोध करत हिंदूमहासंघाने 13 जुलै 2022 रोजी कोर्टाला आवाहन दिलं आहे. त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More