पुणे | राज्यात कोरोना पुन्हा वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यावर काही निर्बंध घातले आहेत. यामुळे शिवभक्त सरकारवर संताप व्यक्त करत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
शिवभक्त म्हणून माझी सुद्धा भावना आहे की हे जे निर्बंध घातले त्यामुळे माझाही हिरमोड झाला आहे, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. तसेच आपण दोन पावलं मागे आलो असलो तरी पुढच्या वर्षी जोरात शिवजयंती साजरी करु. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच आपण शिवजयंती साजरी करु, असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
महाराजांच्या 391 व्या शिवजयंतीनिमित्त अमोल कोल्हे यांनी 391 झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तसंच त्यांनी वनउपविभाग जुन्नर आणि पुरातत्व विभागाच्या सहकार्याने शिवनेरीवर 391 झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हे यांनी महाराष्ट्रातील इतर गावांनाही झाडे लावण्याचे त्याचबरोबर लावलेली झाडे जगवण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, आज रायगडावर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यावेळी डिस्को लाईटचा वापर करण्यात आला. यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली. जे घडलं त्या बाबत मला जास्त माहिती नाही, असं अमोल कोल्हे म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भााषा शिकणार- उद्धव ठाकरे
गलवान खोऱ्यात ‘इतके’ सैनिक गमावले; चीनने पहिल्यांदा दिली कबुली
डाॅली की टपरी!!! सोशल मीडियावर आता या चहावाल्याचा जलवा, पाहा व्हिडीओ
प्रत्येक कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा- राजेश टोपे
आघाडी सरकारमधील या मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना; 4 मंत्री पाॅझिटिव्ह आढळल्याने खळबळ