बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एक आई म्हणून तुम्हाला विनंती करते…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा झाली व्यक्त!

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलं आहे. पॉर्न व्हिडीओ शूट करणं आणि ते ऑनलाईन प्रदर्शित करणं हा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला आहे. राज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पाच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. शिल्पाला अनेक कामे सोडावी लागली आहेत.

पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पाविषयी अनेक अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. राज कुंद्राच्या प्रकरणाविषयी शिल्पाला सर्व गोष्टी माहित असल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र, या प्रकरणावर आता शिल्पाने पोस्ट शेअर करत माझ्या आणि माझ्या कुटुंबाविषयी अफवा पसरवू नका, अशी विनंती केली आहे.

शिल्पा म्हणाली की, सध्याचे दिवस हे आमच्यासाठी आव्हानात्मक आहेत. माध्यमांनी मााझ्याविषयी अनेक अनावश्यक गोष्टी पसरवल्या आहेत. माझ्या कुटुंबाला ट्रोल करण्यात आलं. मात्र, मी कोणतीही गोष्ट अजून बोलले नाही. ही सर्व न्यायालयीन प्रक्रिया आहे यामुळे मी याच्यावर बोलणं टाळलं आहे त्यामुळे माझं नाव घेऊन कोणी अफवा पसरवू नये.

दरम्यान, एक कुटुंब म्हणून विशेषत: एक आई म्हणून मी तुम्हाला विनंती करते की, माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. मागील 29 वर्षांपासून कायद्याचं पालन करुन मेहनत करणारी मी महिला आहे. यामुळे कृपया संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय अर्धवट माहितीच्या आधारे टिपण्णी करू नका, अशी विनवणीही शिल्पाने केली आहे.

थोडक्यात बातम्या –

बाबो! ‘या’ माजी मंत्र्याने केली तब्बल 6 लग्न, पत्नीनेच केला गुन्हा दाखल!

उत्तर प्रदेशमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला फक्त विकास दिसेल- अमित शहा

…याच जिल्ह्यातील दुकानांच्या वेळेत वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार”

लग्नात नवरीने केली धमाकेदार एंट्री, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More