बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलगी लग्नास तयार होत नव्हती म्हणून… बापाच्या कृतीनं महाराष्ट्र हादरला!

सांगली | मुलीने लग्नास नकार दिल्यामुळे वडिलांनी स्वतः च्या पोटच्या पोरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सांगली मधील बनपुरी येथे घडली असून या घटनेनंतर महाराष्ट्र हदरला आहे. या प्रकरणातील आरोपीचं नाव उत्तम महादेव चौगुले असं आहे.

13 मार्च शनिवारी रात्री ही घटना घडली असून हत्त्येच्या आठ दिवसानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. उत्तम चौगुले याच्या मुलीला पाहुणे बघायला येणार होते. या दरम्यान आत्ताच लग्न नको असा हट्ट मुलीने धरल्यामुळे बाप लेकीच्यात वाद पेटला. हा वाद चालु असताना उत्तम चौगुलेने रागात येऊन मुलीला बेडग्यानं बेदम मारलं. डोक्यात मार लागल्यामुळे मुलगी खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

मुलीच्या मृत्यूची घटना समजताच लोकांनी चौकशी केल्यानंतर आपल्या मुलीला ह्रदयाचा झटका येऊन मृत्यू झाल्याचं चौगुले यांनी सांगितलं. अनेक माणसं अंत्यविधीसाठी जमा झाली होती. अनेकांना ही घटना संशयास्पद वाटली. त्यामुळे बहुतांश साऱ्यांनीच काढता पाय घेतला.

आरोपी उत्तम चौगुले याने इतर चौघांना सोबत घेऊन घराशेजारीच असलेल्या ओढापात्रात शेतातील लाकडे गोळा करून मध्यरात्री अंत्यविधी केला. प्रेत अर्धवट जळल्यामुळे पहाटे ते ओढा पात्रातच दफन केलं. मात्र हा प्रकार समजताच आज पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपी उत्तम चौगुले याला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर उत्तम चौगुले यांने स्वतःच्या मुलीचा खून केल्याची कबुली दिली.

थोडक्यात बातम्या-

माही रिटन्स! मैदानावर येताच धोनीनं टोलवला 114 मीटरचा सिक्स; पाहा व्हिडीओ

धक्कादायक! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘या’ महिलेनं केली तक्रार दाखल

महिलेचा मोदींसोबत फोटो छापून आला, वास्तव समोर आल्यावर उडाली खळबळ

मोठी बातमी : 100 कोटी प्रकरणात आता ‘ईडी’ची एन्ट्री?

…म्हणून या जोडप्यानं नव्या शेजाऱ्यांना वाटली चक्क मोफत बीअर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More