बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

पुणे | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल असतो. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

मागील चार दिवस पुण्यातील सराफा बाजारात सोन्याचा दर स्थिर होता. मात्र, काल पुणे शहरात सोन्याच्या दरात 150 रुपयांची घट अनुभवायला मिळाली होती. आज पुन्हा सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढ झाली आहे. आज पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 450 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे.

सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र आज पुन्हा घट पाहायला मिळाली आहे. आज पुण्यातील सराफा बाजारात प्रती किलो चांदीमागे 700 रुपयांची घट झाली आहे. 700 रुपयांच्या घटीसह आज चांदीचा दर 66 हजार 400 रुपये प्रती किलोवर बंद झाला आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

“मला न्याय मिळाला नाही तर मी धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेल”

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कौतुकास्पद! मराठमोळ्या अभिनेत्रीची पुरग्रस्तांना तब्बल 10 कोटींची मदत

पुणे हादरलं! दत्ता फुगेंच्या मुलाच्या कानशिलात लगावल्याचा राग, तरुणाची हत्या

…म्हणून मी रुग्णालयात दाखल झालो होतो; जयंत पाटलांचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More