बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! बेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली झोपले अन् पत्नीसमोर सोडला प्राण

चंद्रपूर | कोरोनाने देशभरात थैमान घातलं आहे. राज्यातील आकडेवारीही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. एकीकडे कोरोना आपले हातपाय पसरवत असताना दुसरीकडे बेडची कमतरता आणि आक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. आक्सिजन आणि बेड वेळेवर न मिळाल्यामुळे कित्येकांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे. अशाचप्रकारे चंंद्रपुरमध्ये बेड न मिळाल्यामुळे झाडाखाली झोपलेल्या एका कोरोनाबाधिताचा मृत्यु झाला आहे.

शहरातील मुख्य शासकीय कोविड रुग्णालय परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. बापू कापकर असं कोरोनाबाधिताचं नाव आहे. भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावातून एक वृद्ध जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील कोविड रुग्णालयमध्ये ते सकाळी आठ वाजता दाखल झाले होते. मात्र 12 तास त्यांना बेड मिळाला नाही. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संपर्क साधत बेडसाठी प्रयत्न केले.

त्यांच्या प्रयत्नांना यश आलं मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. कारण कोरोनाबाधित बापू कापकर यांचा मृत्यु झाला होता. बेड मिळाला नाही म्हणून त्यांनी जवळच्या कडुलिंबाच्या झाडाखाली आसरा घेतला होता आणि तिथेच त्यांनी आपल्या पत्नीसमोर प्राण सोडले.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधित 14 हजाराच्या आसपास पोचले आहेत. त्यातच बेड, डॉक्टर, इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. मात्र असं किती दिवस चालणार?, अशा प्रकारे किती जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागणार?, यावर जिल्हा प्रशासन सांगत की प्रयत्न सुरू आहे बास बाकी काहीच नाही.

थोडक्यात बातम्या – 

आजपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची संपूर्ण नियमावली; वाचा एका क्लिकवर…

आरे भावा तुच जिंकलाय टॉस! टॉसदरम्यान गोंधळला विराट कोहली, पाहा व्हिडीओ

चिंता वाढली… महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

मोठी बातमी! ‘या’ राज्यातील प्रत्येक व्यक्तिला मोफत लस मिळणार, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

“लॉकडाऊनचा निर्णय मान्य, पण…”; अमृता फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More